भ्रष्टगीत
धनं, सोनं, मन खलनायक हे,
भ्रष्टाचारच याचा भाग्यविधाता!
२-जी स्पेक्ट्रमचे भूत जुने,
यु. एल. सी. चे नवे प्रकरण उघडले आता!
आय. पी. एल. घोटाळा कमी पडला,
म्हणून की काय, हे देवा!
दाढीतही लपवल्या नोटा,
जसा यांच्या बापाचाच आहे ठेवा!
कॉर्पोरेट जगतालाही हलवणारा,
'बिग बुल' करून गेला अर्थव्यवस्थेला जखम!
त्याला तोडीस तोड म्हणून की काय,
'सत्यम'लाही डसून गेला तो लिंगम!
तिन्ही लोकांत पसरली आहे,
ह्या भ्रष्टाचाराची अपकीर्ती!
नालायकांनो आता तरी थांबवा,
खावून खावून खाणार तरी किती!
No comments:
Post a Comment