तरुणाई
ही तरुणाई असते तरी काय?
वयात आलेली व्यक्ती की,
जोशात असमंजसपणे काम करणारी शक्ती,
विचार करण्यास सुदृढ झालेली मूर्ती की,
अविचारी म्हणून तिन्ही लोकात पसरलेली अपकीर्ती,
स्त्रीविषयीचे आकर्षण वाटणारी विकृती की,
अचानक ब्रह्मचार्याचे विचार स्फुरणारी स्फूर्ती,
नक्की हि तरुणाई असते तरी काय???
कुणालाही उत्तर देता येणार नाही अशीच आहे हि तरुणाई...!!!
संपूर्णपणे द्विधेत सापडलेली तरुणाई!!!
तरुणाई!!!
तरुणाई!!!
ही तरुणाई!!!
No comments:
Post a Comment