सूर्यपुत्र
हे सूर्यपूत्रा!
तुझ्यासारखा पराक्रमी तूच,
पर्वतालाही लाज वाटावी
अशी तुझी ती शरीरयष्टी!
जीच्या जोरावर,
तू जिंकला होतास ही अखंड पृथ्वी!
हे वसुसेना!
सिंहाची आयाळही
पडावी फिकी,
अशी तुझी ती कुरळी केसं!
अनेक स्त्रिया पडल्या मोहात,
पाहून तुझी ती निळीशार नयनं!
हे राधेय!
तुझ्या त्या मातृप्रेमाला
नाही रे तोड!
कौंतेय असूनही
न जाऊ दिला तू
राधामातेच्या प्रेमाला तडा!
हे दानशूरा!
कधीही व्हायचा नाही
तुझ्यासारखा दानवीर खरा!
मृत्यू तोंडाशी असतांनाही
नाही विसरलास
धर्म तुझा!
हे मृत्युंजयी!
खूप सहन केलास तू अन्याय, अपमान,
तरीही दिलास अखेरपर्यंत प्रखर लढा!
अरे शूरवीर कर्णा!
तुझ्या ह्या निरपेक्ष जीवनाला
ह्या सूर्यभक्ताचा कोटी कोटी प्रणाम!!!!!